महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची यादी प्रदेशाध्यक्ष चांदशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून राज्यातील 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली
आहे. बऱ्याच दिवसापासून राज्यातील भाजपा जिल्हाअध्यक्ष निवडी राहिल्या होत्या, प्रदेशाध्यक्ष चांदशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी राज्यातील नवीन भाजपा जिल्हा अध्यक्ष पदाची नवी यादी जाहीर केली. लातूर जिल्हा भाजपाच्या शहर आणि ग्रामीण अध्यक्ष म्हणून या वेळेस नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
लातूर शहर जिल्हाअध्यक्ष पदी पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि माजी महानगरपालिका उपमहापौर असलेले देविदास काळे यांना संधी दिली आहे. तर लातूर ग्रामीण भाजपा जिल्हाअध्यक्ष पदी अहमदपूर येथील दिलीपराव देशमुख यांना संधी दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या
जिल्हाध्यक्षांची यादी प्रदेशाध्यक्ष चांदशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून राज्यातील 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.