Kirit Somaiya मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडिओची सत्यता तपासून घ्यावी – भाजपचे नेते किरीट सोमय्या

महाराष्ट्र खाकी (मुंबई / विवेक जगताप) – महाराष्ट्राचे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ एका मराठी वृत्त वाहिनीने समोर आणला आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ त्यांच्या हाती असल्याचा दावा हे चॅनल करत आहे, ज्यामध्ये किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणी आता किरीट सोमय्या

यांनीउपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. किरीट सोमम्या यांनी फडणवीसांना दिलेल्या पत्रात व्हिडीओ संदर्भात चोकशी करण्याच्या विनंती केली आहे. विनंती केली आहे एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ

क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असे अत्याचार झालेला नाही अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी अशी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंति केली आहे.

Recent Posts