पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा कालही, आजही तीच विनंती पवारसाहेबांकडे केली – प्रफुल पटेल

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – अजित पवार गटाच्या 30 आमदारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या आमदारांनी तासभर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. सलग दुसऱ्या दिवशी अजितदादा गटाने शरद पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल

पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी काल (रविवारी) आम्ही शरद पवारसाहेब यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. काल ( दि.16 जुलै रविवारी) सगळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते.

आज (दि.17) जुलै विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून बरेच आमदार उपस्थित झाले. त्यामुळे आज आदरणीय शरद पवारसाहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला उपस्थित आहेत हे समजल्यावर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आणि प्रत्येक आमदारांनी पवारसाहेबांचे आशिर्वाद घेतले असेही प्रफुल पटेल यांनी

स्पष्ट केले. रविवारी पवारसाहेबांनी जसं आमचं ऐकून घेतलं तसं आजही ऐकून घेतलं. त्यांच्या मनात काय आहे हे मी कसे सांगू शकतो. मात्र आमचं म्हणणं ऐकून घेतलं हेही आवर्जून प्रफुल पटेल यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे