महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर पोलीस दलात प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधिक्षक म्हणून अंकिता कणसे कार्यरत आहेत. प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधिक्षक म्हणून अंकिता कणसे यांच्या नेतृत्वात अनेक गुन्हे उघडकीस आणि अवैद्य धंद्यावर कारवाया होत आहेत. अंकिता कणसे यांच्या नेतृत्वात लातूर शहरात अवैद्यरित्या
चालू असलेल्या वेश्या व्यवसाय चालू असलेल्या घरावर धाड टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लातूर शहर परिसरातील एक महिला, व एक पुरुष घरात बाहेरून स्त्रियांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून देहविक्रीय व्यवसाय करून घेत आहे. अशी गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली या माहितीची खातरजमा केल्यानंतर सदरची बाब
खरी असल्याचे निदर्शनास येताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनात व नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधिक्षक अंकिता कणसे, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे, मपोउपनि. श्यामल
देशमुख, एएचटीयु, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांचेसह पथकातील अधिकारी व महिला अमलदार यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून देहवीक्री होत असलेल्या ठिकाणी छापा मारण्यात आला. त्या ठिकाणी देहविक्री करीत असताना 3 पिडीत महिला व वेश्या व्यवसाय करून घेणारी एक महिला व एक पुरुष आढळून आले.
त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 14,044/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पिडीत महिले कडून देहविक्री व्यवसाय करून घेणारी महीला स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर गावाच्या महिलांना स्वतःच्या घरात ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेते व आम्हाला
काही रक्कम देऊन आमची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करते असे पीडित महिलांनी सांगितले. या प्रकारा बाबत MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 523/2023. कलम 370 ,34 भा.द. वि. तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1959, कलम-3,4,5, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेस अटक
करण्यात आली आहे. या कार्यवाही वरिष्ठांचे मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधिक्षक, श्रीमती. अंकिता कणसे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे महिला पोलिस उप निरीक्षक, श्यामल देशमुख,पोह.सदानंद योगी, मपोना सुधामती वंगे, लता गिरी, वाहन चालक बुड्डे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरख दिवे हे करीत आहेत.