महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर सह राज्याच्या व्यपारी क्षेत्रातील प्रतिष्ठित नाव असलेले अजय ठक्कर यांनी उजनीच्या पाण्यावरून नाव न घेता लातूरच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. लातूरला उजनीहून पाणी आणण्याची मागणी सन 2004 मध्ये पुढे आली होती. मात्र, त्या वेळी मांजरा धरणातून जलवाहिनी टाकण्यात
आली. त्यावर आत्ता पर्यंत कशीबशी काढण्यात आली पण बऱ्याच लातूरकरांना रोज पाणी मिळालेच नाही, मागील काळात लातूरच्या राजकारणात उजनीच्या पाण्यावरून विरोधकांनी त्या वेळेस च्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता, पण उजनीच्या पाण्यावरून लातूरचे राजकारण चांगलेच गरम होत असते, अधून मधून लातूरचे
राजकारणी, समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि व्यपारी उजनीच्या पाण्याबाबत चर्चा करत असतात. लातूरच्या व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले अजय ठक्कर यांनी कालच उजनीच्या पाण्यावरून एक सोशल मीडियावर “उजनी चे पाणी लातूर ला येणार नाही असे माझे मत आहे कारण लातूर ला फक्त
घोषणा करणारे नेते आहेत.” अशी पोस्ट करून लातूरच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. अजय ठक्कर यांचा रोष नेमका कोणत्या नेत्यावर आहे अशी चर्चा जिल्हाभारत होताना दिसत आहे.