महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूरच्या वेक्तीनी आपल्या कार्यातून आपली आणि लातूरची ओळख जागतीक केली आहे यात लातूरच्या सृष्टी जगताप या लेकीने सलग 127 तास नृत्य सादर करून जागतीक विक्रम केला आहे. आणि या विक्रमाची दाखल घेऊन सृष्टीचे आणि लातूरचे नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
मध्ये नोंद झाली आहे. या आधीही सृष्टीने 24 तास नृत्य सदर करून विक्रम केला होता. लातूरची लेक सृष्टी सुधीर जगताप ही दयानंद कॉलेज महाविद्यालयाच्या सभागृह येथे जागतिक रेकॉर्ड नोंदवण्याकरिता 29 मे रोजी सलग 127 तास नृत्य करण्यास सुरुवात केली आणि सृष्टीने 3 जून रोजी दुपारी 1 वाजता 127 तास पूर्ण करून लातूरचे
आणि स्वतःचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट केले, ही बाब लातूर सह महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. सृष्टीला सपोर्ट करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय अशा अनेक क्षेत्रातीला प्रतिष्ठित वेक्तीनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. सृष्टीच्या आधी 123 तास नृत्य करण्याचा विक्रम
केरळमधील कलामंडपम मध्ये हेमलता हिच्या नावावर आहे आणि 2018 मध्ये बंदना या नेपाली मुलीने 123 तास आणि काही मिनिटे नृत्य करून नवीन गिनीज बुक रेकॉर्ड निर्माण केला आणि आता आपल्याला लातूरची सृष्टी 127 तास नवा विश्व रेकॉर्ड केला आहे.