महाराष्ट्र खाकी (छत्रपती संभाजीनगर / विवेक जगताप ) – गेल्या आठवड्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर (IAS Officer Transfers ) आता राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहे. छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal
Corporation) आयुक्त अभिजीत चौधरी (Abhijeet Chaudhary) यांच्यासह राज्यातील एकूण 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जीएसटी (GST) कार्यालयात कार्यरत असलेले जीएसटी सहआयुक्त जी श्रीकांत (G Srikanth) यांची संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली
करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली झाली आहे. सोबतच राज्यातील इतर नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आले आहे.