Ahmadpur news निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी माजी आमदार विनायकराव पाटील,कल्याण बदने आणि बालाजी गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र खाकी ( अहमदपूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना माजी आमदार विनायकराव पाटील,कल्याण बदने आणि बालाजी गुट्टे यांनी मतमोजणी केंद्रावर जात गोंधळ घालत निवडणूक निर्णय अधिकारी वसंत घुले यांना धक्काबुक्की केली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी वसंत घुले यांच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. अनेक ठिकाणच्या बाजार समितीच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. काही ठिकाणी तणावही दिसून आला होता. अहमदपूर कृषी

उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी सुरू असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या तक्रारीनंतर अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर 23 वर्ष भाजपाची एक हाती सत्ता होती. काही

वर्ष प्रशासकांची नियुक्ती कृषी उत्पन्न बाजार समितीवर करण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने 18 पैकी 13 जागेवर विजय मिळवला आहे. भाजपाच्या हातून सत्ता निसटली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना माजी

आमदार विनायकराव पाटील आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी मतमोजणी केंद्रावर जात गोंधळ घातला. निवडणूक निर्णय अधिकारी यांना धक्काबुक्की केली होती. मध्यरात्रीनंतर अहमदपूर पोलिसात याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी वसंत घुले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदपूर पोलिसांनी

विनायकराव पाटील, कल्याण बदने, बालाजी गुट्टे यांच्यासह इतर एकाविरोधात भारतीय दंड विधान कलम 353, 332, 171 एफ, 114 आणि 34 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Recent Posts