महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा रुग्णालया साठी लागणारी कृषी महाविद्यालयाची जमीन प्रकरण बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते. कृषी मंत्री अब्दुल सत्तार लातूर दौऱ्यावर आले असता लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांनी जिल्हा रुग्णालयाच्या जागे संबंधि सांगितले असता लातूरच्या
जिल्हा रुग्णालयाला लागणारी 10 एकर जमीन कृषी विभागाकडून वर्ग केली जाणार असल्याची घोषणा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. लातूर जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी कृषी महाविद्यालयाची 10 एकर जमीनची मागणी प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी यांनी आपल्याला सांगितले. इथल्या
शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमीन कृषी शिक्षण, संशोधनासाठी दिली आहे, त्यांच्या आरोग्यासाठी आपण दहा एकर जागा देऊ अशी घोषणा कृषी मंत्र्यांनी यावेळी केली. कृषी महाविद्यालयाच्या अनुसूचित जातीच्या मुलीसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाच्या उदघाटन
प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. हेमंत पाटील, वसंतराव
नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणि, मा. आ. पाशा पटेल, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, कृषी अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले यांच्यासह संशोधक, प्राध्यापक उपस्थित होते.