Girish mahajan देव लोकांवरील संकट स्वतःवर घेत आहे – वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – देव लोकांवरील संकट स्वतःवर घेत आहे, राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी असे म्हणताच पत्रकार परिषदेत सर्वांचाच हशा पिकला. राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री

गिरीश महाजन यांचा आज दि. 30 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणि गारपीट च्या पार्श्वभूमीवर लातूरचा दौरा केला. दौऱ्या दरम्यान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला, या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने पालकमंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला की विजा या मंदिराच्या

कळसावर (मंदिरावर) जास्त पडत आहेत याचे करण सरकार बदलल्या मुळे तर नाही ना ? असा प्रश्न विचारताच खिलाडी वृत्ती आणि हजरजबाबी पणा असलेल्या गिरीश महाजन यांनी मजेशीर पण मार्मिक उत्तर देत म्हणले की सरकार बदल्यामुळे देव लोकांवरील संकट स्वतःवर घेत आहे असे म्हणताच बाजूला बसलेले औसा मतदारसंघाचे

आमदार अभिमन्यू पवार यांनी उत्साहापूर्वक गिरीश महाजन यांनी दिलेले उत्तर परत एकदा उच्चारले आणि पत्रकार परिषदेत सर्वांचाच हशा पिकला. या सर्व घटनेतून गिरीश महाजन यांची आणि आमदार अभिमन्यू पवार यांची बॉण्डिंग, हजरजबाबीपणा आणि खिलाडी वृत्ती पुन्हा एकदा दिसून आली. राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय

शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि आमदार अभिमन्यू पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू आहेत.

Recent Posts