Latur police लातूर जिल्हा पोलिस दलात 12 दोन चाकी गाड्यांचा समावेश, पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर पोलीस दल अधिक सशक्त करण्यासाठी लातूर पोलीसासाठी 12 नवीन मोटार सायकली घेण्यात आल्या आहेत. त्या नवीन 12 गाड्यांचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काल दि. 30 रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. सोमय मुंडे यांनी

लातूर पोलीस अधीक्षक पदाची सूत्र हातात घेतल्या पासून जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख उतरलेला दिसून येत आहे. गुन्ह्यांचा उतरता आलेख येण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील पोलीस पेट्रोलिंग वाढवली होती. पोलिसांची पेट्रोलिंग आणखी प्रभावी होण्यासाठी जिल्हा पोलीस दला 12 नवीन दोन चाकी

गाड्यांचा ताफा वाढला आहे. या नवीन गाड्यामुळे लातूर पोलिसांची ताकत वाढली यात शंका नाही आणि जिल्ह्यातील कायदा सुवेवस्था वेवसतील ठेवण्यात पोलिसांना या गाड्यांची मदत होणार आहे. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी, जिल्हा पोलीस अधिक्षक

सोमय मुंडे, एम. आय.डी. सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे, वाहतूक पोलीस शाखा पोलीस निरीक्षक गणेश कदम, वाहन शाखेचे पोलीस निरीक्षक महेश काळे उपस्थित होते.

Recent Posts