महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील सात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर करण्यात आले आहे. लातूर पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना
दरवर्षी पोलिस महासंचालकांकडून पदक जाहीर केले जाते. त्यानुसार या वर्षी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर महासंचालक यांनी सन्मानचिन्ह जाहीर केले आहे. यात लातूर जिल्ह्यातील सात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे. यात पोलिस उपनिरीक्षक शेख अय्युब गफूरसाब , पोलिस हेड काँस्टेबल महेश पारडे ,
पोलिस हेड काँस्टेबल खुर्रम काझी, पोलिस हेड काँस्टेबल अनंत शिंदे , पोलिस हेड काँस्टेबल सदानंद योगी , पोलिस हेड काँस्टेबल सलमान नबीजी , पोलीस नाईक परमेश्वर ढेकणे यांचा समावेश आहे. या सर्वांचे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे , अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे,
सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आह आणि जिल्हाभरातून या सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.