महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी) – साखर कारखाने, जिल्हा बँक, बाजार समिती यासह कोणत्याही संस्थेत देशमुखांना काम करणारे संचालक नकोत, केवळ मान हलवणारेच पाहिजे असतात. असं किती दिवस सहन करायचं असा प्रश्न उपस्थित करून बाजार समितीच्या निवडणुकीत स्वाभिमान टिकून ठेवण्यासाठी आणि
शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आव्हान भाजपा नेते राजेश कराड यांनी केले. लातूर तालुक्यातील मौजे निवळी येथे शनिवारी सायंकाळी भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ
आयोजित करण्यात आलेल्या मतदारांच्या बैठकीत राजेश कराड यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना त्यांनी 40 – 40 वर्षे सत्ता उपभोगूनही काँग्रेसवाल्यांना चार पेजचा जाहीरनामा घेऊन मतदारासमोर जावे लागते यापेक्षा अधिक काय दुर्दैव असू शकते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असते तर ही पाळी आली नसती मात्र या मंडळींना
केवळ निवडणुकीत शेतकरी आठवतो निवडणुका होताच शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःचा आणि आपल्या बगलबच्चाचाच फायदा कसा होईल यासाठी त्यांचे काम असते असेही राजेश कराड यांनी बोलून दाखविले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, बाबू खंदाडे, उमेश बेद्रे,
संतोष शिंदे, संभाजी वायाळ यांच्यासह किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारावर कडाडून टीका केली व शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीच्या प्रगतीसाठी आ रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड
बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले प्रारंभी सुरज शिंदे यांनी प्रास्ताविक केले. शेवटी अँड धनराज शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी निवळी जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक गावचे सरपंच चेअरमन आणि बाजार समितीचे मतदार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.