लातूर मधील विर सावरकर गौरव यात्रेच्या बॅनर वर आमदार अभिमन्यू पवार आणि रमेश अप्पा कराड कराड यांना स्थान नाही

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर शहरातील विर सावरकर गौरव यात्रेच्या बॅनर वरून लातूर भाजपा मधील गटबाजी पुन्हा दिसून आली, भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक बॅनर लावले आहे या बॅनर वर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि विश्वासू औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि

भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड या दोघांचे फोटो नाहीत . लातूर भाजपा मध्ये गटबाजी राजकारणामुळे लातूर मनपाची मिळालेली सत्ता आणि भाजपाचा लातूर ग्रामीण मतदारसंघ गमवावा लागला इतके मोठे नुकसान होऊनही लातूर भाजपाच्या नेत्याला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समज येत नाही ही खेदाची

बाब म्हणावी लागेल, पहिल्या वेळेस आमदार झालेले पवार आणि कराड यांनी आपल्या मतदारसंघात जो विकास कामांचा धडाका लावला आहे हे पाहून या दोन्ही आमदारांचे नाव देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत गेले आहे आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरले आहे. अभिमन्यू पवार हे लातूरचे एकमेव आमदार आहेत

त्यांचे विधानसभेतील प्रश्न चर्चेचा विषय ठरतात आणि उपस्तित केलेला प्रश्न मार्गी लागतो, यामुळे अभिमन्यू पवार यांचे जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात मान सन्मान वाढत आहे पण हा वाढत असलेला मानसन्मान जिल्ह्यातील भाजपाच्या काही नेत्यांना रुचत नाही हे या बॅनर वरून दिसत आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या

बाबतीत हे पहिल्यांदा झाले नाही या अगोदरही असेच अभिमन्यू पवारांचा फोटो बॅनर वरून घेतला नव्हता, म्हणून जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते आमदार अभिमन्यू पवार यांना आपला नेता कधी मानतील का असा प्रश्न उपस्तित होत आहे, भाजपचेच कार्यकर्ते आपल्या आमदारांचा मान ठेवत नसतील तर जनता काय ठेवणार

हाही प्रश्न उपस्तित होतो म्हणून जिल्ह्यातील सत्ता केंद्र काँग्रेस कडे आहे असे म्हणावे लागेल, एक वर्षा पूर्वी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती की जिल्ह्याच्या कोणत्याही कार्यक्रमास आणि निमंत्रण पत्रिकेवरती नाव आणि माहीती नसते, खासदार म्हणून मान सन्मान मिळत नाही,

खासदार सुधाकर शृंगारे यांना तर दुसऱ्या पक्षाचे लोक मान सन्मान देत नव्हते मग आता तर भाजपाचेच लोक त्यांच्याच आमदारांना आणि विशेषता जिल्हा अध्यक्षालाच बॅनर वरती स्थान नाही. या बॅनर प्रकरणाचा लातूर भाजपा मधील गटबजीला खत-पाणी मिळेल यात शंका नाही.

Recent Posts