महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्याबद्दल खास गोष्टी

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीदिनी निलंगा शहरातील महाराष्ट्र महाविद्यालच्या प्रांगणावर साडेदहा फुट उंच, एक टन वजनाच्या ब्राॅंझपासून तयार केलेल्या पुतळ्याचे अनावरण विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत झाले हा पूर्णाकृती पुतळा पुण्याचे प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी तयार केला असून त्यासाठी एक वर्ष कालवधी लागला.

हा पूर्णाकृती पुतळा ब्रांझ धातूचा आहे. (औरंगाबाद) छत्रपती संभाजी नगर येथील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वाधिक उंच व मोठा पुतळा बनवणारे दीपक थोपटे यांनी एक वर्षापासून मेहनत घेऊनकै. डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पुतळा बनवला आहे. एक हजार किलो म्हणजे एक टन वजनाचा हा पुतळा असून यावर वारा, ऊन, पाऊस यांचा कोणताही परिणाम

होणार नाही. पुतळ्याची उंची साडेदहा फुट असून तिन्ही ऋतूमध्ये पुतळ्याची झळाळी अधिक प्रमाणात खुलणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि लातूर जिल्ह्यासाठी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे असलेले योगदान, स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता .

Recent Posts