Marathwada Rail Coach Factory मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव द्यावे – मा महापौर विक्रांत गोजमगुंडे

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीला लोकनेते विलासराव देशमुख रेल्वे कोच फॅक्टरी असे नाव द्यावे, अशी मागणी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी

वैष्णव आणि रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना लेखी
निवेदनही पाठवले आहे. लोकनेते विलासरावजी देशमुख
यांचे लातूरकरांवर आणि लातूरच्या नागरिकांचे स्व.देशमुख यांच्यावर अतोनात प्रेम होते. या अनुषंगाने लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे नाव मराठवाडा रेल्वे कोच

फॅक्टरीला देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. लातूरकर नागरिकांनीही  पंतप्रधान
नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहावीत. पत्र अथवा ईमेल आणि इतर उपलब्ध समाज माध्यमांतून आपल्या भावना
त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

माननीय नरेंद्र मोदी हे गुजरात याज्याचे मुख्यमंत्री
असताना विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांच्या कार्याशी ते परिचित आहेत त्यामुळे या मागणीची नोंद घेवून नक्कीच यास मान्यता देतील अशी अपेक्षा माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले.

Recent Posts