कौतुक आणि अभिमान महाराष्ट्रातील कमी वयाच्या शिक्षण संस्था संचालक ओंकार होनराव यांचे

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील लातूर पॅटर्नचे प्रमुख स्थान आणि वेगळी ओळख निर्माण झाली आहे. लातूर पॅटर्नला हे स्थान आणि ओळख मिळवण्यात अनेक शिक्षण संस्था चालकांचा मोलाचा वाटा आहे. पण या सर्व शिक्षण संस्था चालकामधून एक वेक्तीमत्व असे आहे. त्यांनी अगदी कमी वयात राज्याने आदर्श घ्यावा अशी शिक्षण संस्था चकवत

आहेत. ते म्हणजे श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे संचालक ओंकार होनराव आज त्यांचा वाढदिवस आहे.
ओंकार होनराव यांच्या नेतृत्वात श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांचा ‘लातूर पॅटर्न’ सर्वप्रथम सुरू केला. त्याला आणखी नव नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी ओंकार होनराव प्रयत्न करत असलेले कार्य उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. ओंकार

होनराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवक या शैक्षणिक उपक्रमात खऱ्या अर्थाने यशासोबत सामाजिक दायित्व म्हणून उत्तमरीत्या पेलवत आहेत. ओंकार होनराव यांच्यातील शैक्षणिक कामगिरी व सामाजिक दायित्वाची जाण उत्तरोत्तर वाढत जात आहे. शिक्षण संस्थेत नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत भारतीय संस्कार कसे देता येतील यासाठी ओंकार होनराव सतत

प्रयत्नशील असतात. इतक्या कमी वयात एखादी राज्य स्तरीय शिक्षण संस्था चालवणारे ओंकार होनराव हे महाराष्ट्रातील पहिले तरुण आहेत. श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत अभ्यासू, शांत आणि संयमीपणा असलेले तरुण संचालक ओंकार होनराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आत्ता पर्यंतच्या यशस्ववी वाटचालीबद्दल अभिनंदन.

Recent Posts