महाराष्ट्र खाकी ( उदगीर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात LCB पथकाच्या धडाकेबाज कारवाया सुरु आहेत. LCB च्या या कारवायामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे, मोठे गुन्हे, दरोडे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची उकल होऊन गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले आहे. या मुळे नागरिकांतून LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे
यांच्या कार्याचे कौतुक आणि समाधान वेक्त होत आहे. LCB पथकाकडून अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 07/01/2023 रोजी सायंकाळी 18.30 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चीघळी गावाचे शिवारातील बाळासाहेब कांतराव पाटील याचे शेतातील पत्र्याच्या शेड
वर छापा मारून बाळासाहेब कांतराव पाटील राहणार चिघळी तालुका उदगीर, जनार्दन रघुनाथ पेठे, वय 35 वर्ष, राहणार गुरदार, तालुका उदगीर, गंगाधर धोंडीबा सोनटक्के, वय 28 वर्ष, राहणार लोहारा, तालुका उदगीर, ओमप्रकाश बाबुराव जाधव, भाकसखेडा, तालुका उदगीर. वसंत कांतराव पाटील, वय 40 वर्ष, राहणार चिघळी, तालुका उदगीर,, प्रशांत शेषराव पाटील, वय 50 वर्ष,
राहणार देवर्जन, तालुका उदगीर, मनोज रामराव शिवहार, 38 वर्ष, राहणार लोहारा, तालुका उदगीर, प्रशांत रमाकांत सोनटक्के, राहणार लोहारा, तालुका उदगीर, बालाजी सुभाष पेठे, वय 42 वर्ष, राहणार गुरदाळ, तालुका उदगीर. हे सर्व आरोपी मौजे चीघळी गावाच्या शिवारातील बाळासाहेब कांतराव पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या शेड मध्ये ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे
तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने असा एकूण 9 लाख 56 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 19/ 2023, कलम 12 (अ) मुंबई जुगार अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला
असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद मुद्देमाल व नऊ इसमांना पुढील तपास कामी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव,पोलीस अंमलदार बालाजी जाधव, खुर्रम काझी, विनोद चिलमे, रवी कानगुले, नकुल पाटील यांनी केली आहे.