महाराष्ट्र खाकी (रेणापूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात कराड परिवाराने शेतकऱ्यासाठी आणि जिल्ह्याच्या विकासाठी सतत प्रयत्नशील असते. रमेशअप्पा कराड आमदार झाल्यापासून प्रामुख्याने लातूर ग्रामीण मतदार संघातील सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. आमदार रमेश अप्पा कराड यांचे बंधू राजेश कराड यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लातूर
तालुक्यातील मौजे रामेश्वर येथे येत्या 9 जानेवारी 2023 रोजी प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार पाशा पटेल, लातूर जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने, हिंदुस्थान इन्सेक्टीसाइड्स लिमिटेडचे विकास यादव यांच्या उपस्तितीत हिंदुस्थान इन्सेक्टीसाइड्स
लिमिटेड (हिल इंडिया) हा केंद्र सरकारचा उपक्रम तसेच अनुलोम संस्था व प्रयाग ग्रीन्स शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी एका प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रशिक्षण वर्गात पिकांवर रासायनिक कीटकनाशके व औषधांच फवारणी करताना घ्यावयाची काळजी या संदर्भात देशभरातील नामवंत तज्ञातर्फे मार्गदर्शन करण्यात
येणार आहे. त्याच प्रमाणे सुधारीत शेती, गट शेती, बांबु लागवड आणि शासकीय योजना या सर्व विषयाचे तज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. हे प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी अतिशय मोलाचे ठरणार आहे आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महत्वपूर्ण मेळाव्यास आवर्जुन उपस्थित रहावे अशी विनंती या मेळाव्याचे संयोजक आणि प्रयाग ग्रीन्स शेतकरी उत्पादक कंपनीचे
चेअरमन राजेश कराड यांनी केले आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी लातूर ग्रामीण कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त प्रयोगशील शेतकऱ्यांनी खालील दिलेल्या प्रतिनिधिकडे नावे नोंदवावी. अँड दशरथ सरवदे – 9421448144, बन्सी भिसे – 9545578001, राजकिरण साठे – 9960850964, संवाद कार्यालय लातूर – 9860017174