महाराष्ट्र खाकी ( औसा / प्रतिनिधी ) – पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध शस्त्रांचे संबंधाने माहिती काढून त्यावर कारवाई करण्या बाबत निर्देशित दिले आहेत . त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, औसा मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनात (LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पथक तयार
करुन अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येत आहे. याचसंबंधाने माहिती काढत असताना (LCB) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिनांक 03/01/2023 रोजी गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे भादा हद्दीतील अंधोरा गावात एक युवक हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्याने सदर पथकाने तात्काळ आंदोरा गावात
जाऊन हातात तलवार घेऊन फिरणारा युवक अक्षय सतीश आंबेकर, वय 26 वर्ष, राहणार आंदोरा तालुका औसा जिल्हा लातूर. याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक लोखंडी तलवार मिळून आली. ही तलवार जप्त करण्यात आली आणि युवकावर पोलीस स्टेशन भादा येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास
भादा पोलीस करीत आहेत. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव सहायक फौजदार , संजय भोसले, पोलीस अमलदार राजेंद्र टेकाळे, राम गवारे, मोहन सुरवसे, प्रकाश भोसले, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.