महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी सध्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गेले अनेक दिवस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अखेर 30 डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. या चित्रपटातून रितेशने
दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर त्यांची पत्नी जिनिलीया देशमुख यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. अशा परिस्थितीतही रितेश आणि जिनिलीया प्रेक्षगकांचं मन जिंकण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. विशेषतः या चित्रपटातील गाणे प्रेक्षकांना ज्यास्त आवडले
आहेत. या चित्रपटातील “मला वेड लावलंय” या गाण्यावर लातूरचे मा. महापौर विक्रांत गिजमगुंडे यांनी डान्स केला आहे. आणि हा व्हिडीओ सध्या लातूर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विक्रांत गोजमगुंडे यांनी एकदम हुबेहूब डान्स केला आहे. विक्रांत गोजमगुंडे यांच्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे.