लातूर जिल्ह्यातील गुटखा विक्री मागचा मास्टर माईंड कोण ? आणि या मास्टर माईंडला आशीर्वाद कोणाचा ?

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – मागील काही महिन्यात लातूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी लाखो रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बेकायदेशीर गुटखा पकडला . हा गुटखा म्हणजे एक उदाहरण असून, असा किती गुटखा लातूर जिल्ह्यात विशेषतः लातूर शहर आणि उदगीर शहरात विकला जात असेल, याबाबत अंदाज

करणे अवघड असले, तरी यामागे मास्टर माइंड कोण आहे ? हे पाहणे गरजेचे आहे. आज लातूर जिल्ह्यात विशेषतः लातूर शहर आणि उदगीर शहरात अनेक भागांत गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. शासनाने यावर बंदी घातली आहे. मात्र, तरीदेखील विविध कंपन्यांचा गुटखा सहज व राजरोसपणे मिळत असेल, तर एक तो अन्न औषध विभाग लातूर प्राशासनाच्या कुठल्या तरी

कर्मचार्‍याच्या आशीर्वादामुळे मिळत असेल, हे नक्की. गेल्या अनेक वर्षांपासून गुटखाबंदी राज्यात आहे. लातूर जिल्ह्यात विशेषतः लातूर शहर आणि उदगीर शहरात मात्र गुटखा पुरविणारे काही एजंट कार्यरत असून, काही पोलिस हाताशी धरून आपला व्यवसाय जोमात सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा लातूर जिल्ह्यात सुरू आहे. एखादा एजंट सेवा देण्यात कमी पडला, तर त्याच्यावर

कारवाई करायची; म्हणजे तो पुन्हा सेवा देण्यात कमी पडत नाही. मुळात शासनाच्या आदेशाचे पालन होणे महत्त्वाचे आहे की तो नियम स्वतःच्या फायद्यासाठी करणे, अशीच पध्दत सध्या रूढ झाली आहे. एकंदरीत, गुटखाबंदी ही कागदावरच राहली आहे. याचा सर्वाधिक फायदा अन्न औषध विभाग लातूर प्राशासनाच्या अधिकारी व बेकायदेशीर गुटखा विक्रेते यांना झाला आहे. काही

दिवसापूर्वी लाखांचा गुटखा सापडतो, तर अशी मोठी शेकडो विक्रेते, दुकाने आहेत. लातूर जिल्ह्या सोबतच लातूर शहर आणि उदगीर शहराचा व परिसराचा झपाट्याने विकास होऊन लोकसंख्या वाढली आहे. लातूर आणि उदगीर शहरात दुकाने असा अंदाज बांधला, तर लातूर आणि उदगीर या दोन शहरात कोट्यवधी रुपयांचा बेकायदेशीर गुटख्याचा व्यवसाय होत असेल. त्यामागे कोण आहे ? शासकीय यंत्रणा त्यांना पाठीशी घालत आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Recent Posts