महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्याताील कायदा सुव्यवस्था वठणीवर आणण्यासह अवैध धंद्याविरूद्ध पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार आता अवैध धंदा करणार्यांची यादी बनविण्यात आली असे असे वाटत आहे. अवैध धंद्याविरूद्ध विरूद्ध ठोस कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः जुगार, मटका, गुटखा,
वाळू ( रेती ) आणि दारूविक्रेत्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. संबंधित सर्व पोलिस स्टेशननां कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवैध धंदा करणार्यांना लवकरच बस्तान गुंडाळावे लागणार आहे असे सोमय मुंडे यांच्या कार्य पद्धतीवरून दिसून येत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर अवैध धंदेवाल्यांची कुंडली तयार करण्याचे काम हाती घेण्यात
आले आहे. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार, मटका चालविणारे, गुटखा विक्रेते, वाळू माफिया व
दारूविक्रेते यांचा डेटा गोळा करण्यात येत आहे . लातूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नुकताच आढावा घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर गावोगावच्या नागरिकांना भयमुक्त वातावरणात राहता यावे, शालेय मुलींसह महाविद्यालयीन
तरूणी, कामगार महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य
देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत आहे . दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात अवैध धंद्याविरूद्ध मोठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. आणि या कारवाया विरुद्ध जिल्ह्यातील नागरिक लातूर पोलिसाबद्दल समाधान व्यक्त करत आहेत आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे कौतुक करत आहेत.