महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – आज दि.24 वार गुरुवार रोजी सकाळी औसा तालुक्यातील भादा पोलीस स्टेशन हद्दीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी विशेष पथक तयार करून एकंबी-तांडा गावातील विलास ज्ञानु चव्हान आणि धोंडीराम देवराव चव्हान हे चालवत असलेल्या बेकायदेशीर चालू असलेल्या अवैध दारू (आड्यावर) धंद्यांवर अचानक छापे मारून गावठी
हातभट्टीचे अड्डे उद्धवस्त करून रू 22,600/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. 1) विलास ज्ञानु चव्हान व त्याची पत्नी विजाबlई विलास चव्हान, हे बेकायदेशीर हाथभट्टी दारु तयार करून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने, या अड्डयावर भादा पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकली असता, 400/- लिटर गावठी दारूचे रसायन व त्यासाठी वापरणारा 30 किलो गुळ असा
एकूण- 8,600/- रू. चा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांचेवर गु.र.न.186/22 क.65 दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2) धोंडीराम देवराव चव्हान, व पत्नी पारुबाई धोंडीराम चव्हान याचेकडे 650 लिटर गावठी दारूचे मिश्रण व 50 किलो गूळ रू.14,000/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांचेवर गु.र.न.1187/22 क.65 दारूबंदी अधिनियम अन्वये
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकंबी-तांडा गावाती गावठी दारूच्या भट्ट्या उद्धवस्त करून , साहित्य, रसायन व गूळ नष्ट करण्यात आला आहे. संपूर्ण एकंबी – तांड्यात मोठी पोलिस फौज घेऊन गावात पाई फिरून वरील व इतरही अवैध दारु विक्री करणारे यांचे घरांची झडती भादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने घेतली. हि
कारवाई पोलीस अधिक्षक सोमय मुंढे , अपर पोलीस अधिक्षक डॉ.अजय देवरे व औसा DYSP मधुकर पवार यांचे मार्गदर्शनाखाली , सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, PSI शिंदे,ASI महादेव गिरी, ASI भिमु देवकर, HC/160 चंद्रकांत सूर्यवंशी ,HC/1095 शिवरुद्र वाडकर,NPC/1427 फिरोज शेख,PC/1346 मिलिंद कचरे,NPC/ 1257 केशव चौघुले, यांनी केली आहे या कारवाईबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले आणि त्यांच्या टिमचे सर्वत्र कौतुक होत आहे.