महाराष्ट्र खाकी (लातूर / वेविवेक जगताप ) – घरातील पूर्ण वातावरण राजकारणी पन लहानपणापासून शिक्षणासाठी घरापासून बाहेर राहिल्यामुळे राजकारणाचा गंध नसलेले अजित पाटील कव्हेकर यांना राजकारणात इतके सक्रीय लातूरच्या जनतेला पहायला मिळेल याची कल्पना सुद्धा नव्हती. परदेशातून उच्य शिक्षण पूर्ण करून मायदेशी आलेले अजित पाटील कव्हेकर यांनी शिक्षण व्यावसायात
लक्ष घालून नवनवीन उपक्रम राबवून आणि नवीन अभ्यासक्रम सुरुवात करून लातूर पॅटर्नची गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा वाढवला आणि वाढवत आहेत. जिल्ह्याच्या राजकारकारणात कव्हेकर परिवाराचे मोठे नाव आणि योगदान आहे. अजित पाटील कव्हेकर यांनी लातूरच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक लढून ती मोठ्या
मताधिक्यानी जिकूंन लातूरच्या राजकारणातील कव्हेकर परिवाराचा दबदबा कायम ठेवला. नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास तर केलाच त्या सोबत लातूर शहराच्या विवीध समस्या बाबतीत तीव्र आंदोलने करून समस्या सोडवल्या, इतक्या कमी कालावधीत अजित पाटील कव्हेकर यांनी लातूरकरांच्या मानत आपल्या कार्यातून आणि कर्तृत्वाने स्थान निर्माण
केले आहे विशेषतः लातूरच्या तरुणांच्या. लातूरच्या राजकारणात कव्हेकर आणि देशमुख परिवाराचे राजकीय संघर्ष सर्वांनाच माहिती आहे. आधी विलासराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि आता अजित पाटील कव्हेकर आणि अमित देशमुख, लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख यांना पर्याय म्हणून अजित पाटील कव्हेकर यांचा चेहरा लातूरकर
पाहतात. अजित पाटील कव्हेकरांनी खूप कमी कालावधीत आपल्या कार्यातून लातूरकरांना आणि भाजपा ला लातूर शहर मतदारसंघात एक तरुण, संयमी आणि लातूरला पूर्णवेळ लोकप्रतिनिधी म्हणून पर्याय दिला आहे आणि पुढील काळात लातूरची जनता अजित पाटील कव्हेकर यांना आमदार म्हणून स्वीकरून विधानसभेत नक्की पाठवेल हे मात्र खरे आहे.