महाराष्ट्र

पत्रकार प्रशांत साळुंके यांची मराठी पञकार परिषदेच्या लातूर जिल्हा प्रसिध्दीप्रमुख पदी नियुक्ती

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – मराठी पञकार परिषदेच्या लातूर जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.सदर निवड मराठी पञकार परिषदेचे राज्य प्रसिध्दीप्रमुख अनिल महाजन यांनी ही नियुक्ती केली आहे. मराठी पञकार परिषदेचे मुख्यविश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे

यांच्या आदेशाने करण्यात आल्याचे राज्य प्रसिध्दीप्रमुख अनिल महाजन यांनी सांगितले आहे. या नियुक्तीच्या अभिनंदनात रामभाऊ काळगे, झटिंग म्हेञे, लक्ष्मण पाटील, रविकिरण सुर्यवंशी, मल्लिकार्जुन कोळ्ळे, माधव पिटले, परमेश्वर शिंदे,रमेश शिंदे, दत्ताञय परळकर, अस्लम झारेकर, नामदेव तेलंगे, विजयकुमार देशमुख, राजकुमार सोनी, एस.आर.काळे, माधव शिंदे, मोईज सितारी, साजिद पटेल आदींनी केले आहे.

Most Popular

To Top