महाराष्ट्र खाकी ( सांगली / प्रतिनिधी ) बिळूर (ता.जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत असलेल्या उपचारासाठी एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहात पकडले.डॉ. प्रमोद मारूती कांबळे, (वय 46) रा. शिवाजी पेठ, जत, ता. जत असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लाच लुचपत
प्रतिबंधक विभागाने केली. लाच लुचपत विभागाने पंधरा दिवसात तालुक्यातील केलेली ही दुसरी कारवाई आहे.अधिक माहिती अशी की, बिळूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रमोद कांबळे हे कार्यरत आहेत. त्यांनी एका व्यक्तीला व त्याच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली होती. पण उपचार शासन नियमानुसार सवलतीत असून
देखील मागणी केल्याने संबंधित तक्रारदार याने सांगली येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून वैद्यकीय अधिकारी कांबळे यांना रंगेहात पकडले. जत पोलिसात कांबळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, सुरज गुरव
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक, सुजय घाटगे, दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अविनाश सागर, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, संजय संकपाळ, कलगुटगी, अजित पाटील, सलिम मकानदार, रविंद्र धुमाळ, बाळासाहेब पवार या पथकाने कारवाई केली.