स्वकर्तृत्वाने लातूर सह राज्याच्या राजकारणात अस्तित्व निर्माण करणारे युवा महिला नेतृत्व म्हणजे प्रेरणा होनराव

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – राजकारणात आपले कर्तृत्व आणि स्वतःला सिद्ध करण्यात आणि जनतेच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी चांगल्या चांगल्या जणांचे कित्तेक वर्ष जातात, त्यात जर एखादी महिला असेल तर खूप कठीण मार्ग असतो असे म्हणले तर वावग ठरणार नाही. राजकारणात तस पाहता महिलांचे प्रमाण पुरुषापेक्षा कमी आहे. पण ज्या महिला राजकारणात

आहेत त्यांनी आपल्या कर्तृत्वाने महिला राजकारणात चांगले कार्य करू शकतात हे सिद्ध केले आहे. आज अशाच एका महिला राजकारणी आणि समाजारत असलेलल्या उगवत्या नेतृत्वाचा वाढदिवस आहे. त्या म्हणजे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र च्या मीडिया पॅनलिस्ट आणि भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव असलेल्या प्रेरणा होनराव या आहेत.

कुठलाही राजकारणाचा अनुभव आणि वारसा नाही !

प्रेरणा होनराव या एका सामान्य घरातील आहेत. वडील उमाकांत होनराव हे RSS च्या कार्यात सक्रीय सलेले, ते शिक्षक होते त्यांनी नंतर कानिष्ठ महाविद्यालय चालू केले. प्रेरणा होनराव यांच्या घरून कुठलाही राजकीय वारसा नसताना राजकारणात प्रेरणा होनराव यांनी प्रवेश केला. राजकारकारणात येण्याधी त्यांनी सामाजिक कार्यातून

सुरुवात केली. समाजकार्य करून अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. वडील शिक्षक आणि संघात सक्रीय असल्यामुळे प्रेरणा होनराव यांचे वाचन अधीक आहे असे त्यांच्या कार्यातून आणि स्वभावातून दिसते . आणि याच वाचनाच्या बळावर त्यांनी राजकारणात स्वतःला सिद्ध केले आहे.

पक्षाची बाजू मांडण्याची जबादारी
सामाजिक प्रश्नांची जाण आणि उत्तम सांभाषण कौषल्य असलेल्या प्रेरणा होनराव यांना सामान्य नागरिकांच्या अडी अडचणीची आणि प्रश्नांची उत्तम माहीती असल्यामुळे आणि मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण संभाषण कौषल्या मुळे प्रेरणा होनराव यांना पक्षाने मीडिया समोर पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आणि भाजप युवा मोर्चाची प्रदेश सचिव पदाची जिम्मेदारी दिली.

लातूर सह राज्याच्या स्थानिक प्रश्नावर आक्रमक भूमिका
प्रेरणा होनराव यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतल्या पासून त्यांनी लातूर सह राज्यातील अनेक प्रश्नावर आक्रमक भूमिकेसाह प्रश्न उपस्तितीत करत असतात. मग तो राज्यातील महिला सुरक्षेबद्दल, विद्यार्थी प्रश्न, वैद्यकीय परीक्षेचा गोंधळ, पोलीस भरती, लातूर मधील पाणी प्रश्न, मनपाचा गलथान कारभार, असे अनेक मुद्यावर प्रेरणा

होनराव यांनी आक्रमक भुमिका घेऊन न्याय देन्याचे कार्य केले आहे. कालच्या नवीन संसदेमध्ये बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाच्या मुद्यावर प्रेरणा होनराव यांनी उत्तम बाजू मांडली त्याचे पक्षात आणि विरोधी पक्षात कौतुक होत आहे. अशा बऱ्याच गोष्टी आणि मुद्दे आहेत की त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षाचे विचार देशासाठी आणि सामान्य नागरिकांच्या हिताचे आहेत हे दाखून दिले आणि देत आहेत.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे