महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – आषाढीवारीमधील 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरुन जातात त्या मार्गावरील जातात सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकाच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात आल्याची माहिती अवर सचिव
( खा.र.2) ललितागौरी गिरीबुवा यांनी एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे. आगामी सन 2022 च्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या वाहनांना पथकातून सूट देणे तसेच रस्ते दुरुस्तीबाबत या विषयाच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 जुलै, 2022 रोजी बैठक संपन्न झाली. त्यावेळी
पथकर सुटची घोषणा केली होती. या बैठकीत खालीलप्रमाणे चर्चा होऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विभागांना त्या अनुषंगाने सुचना व निर्देश दिलेत, त्यास अनुसरुन सर्व संबंधितांना पुढीलप्रमाणे सुचित केले आहे. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना “आषाढी एकादशी 2022 ” गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद
करुन आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस संबंधित आर.टी.ओ. यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या व आर. टी. ओ. ऑफिसेसमध्ये दिनांक 7 जुलै, 2022 पासून उपलब्ध करुन द्यावेत. पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहून येतेवेळी दिनांक 7 जुलै, 2022 ते दिनांक 15 जुलै, 2022 या कालावधीत ही सवलत पालख्या, भाविक
व वारकऱ्यांच्या हलक्या व जड व वाहनांसाठीच असेल, अशा सुचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसे स्टीकर्स, पासवर नमूद करण्यात यावे. सदरचे पास पथकर सवलती ग्राह्य धरण्यात येतील. याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत त्यासोबत नमुनाही जोडण्यात यावा, अशा सुचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गृह
विभागामार्फत अवगत करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
ग्रामीण वा शहरी पोलीस , प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामार्फत दिले जाणोर कुपन्स , पावती यांची संख्या बाबतीत एकत्रित माहितह उपसचिव ( खा.र-2) सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मंत्रालय, मुंबई -32 यांना माहितीकरिता सादर करावी. पोलीस व परिवहन विभागाने आषाढी एकादशीच्या काळात पास
सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबत माहिती होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना प्रसिध्दी करुन संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात , असे अवर सचिव (खा.र.2) यांनी एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे.