महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – मोदी सरकारने आपल्या कार्यकाळाची 8 वर्ष पूर्ण केली आहेत. गेल्या 8 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठे यश संपादित केलं आहे. मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी सरकराने गेल्या 8 वर्षात देशात घेतलेल्या निर्णयाचे आणि केलेल्या कामाची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवन्यासाठी भाजप युवा मोर्चा
प्रदेश सचिव प्रेरणा होनराव आणि ज्ञानेश्वर चेवले यांच्या संकल्पनेतून लातूर भाजयुमोच्या वतीने ‘विकास रथ’ची सुरूवात करण्यात आली आहे. हा विकास रथ प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. या विकास रथाचा शुभारंभ विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विकास रथाला हिरवा झेंडा दाखवून या विकास रथद्वारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोदी सरकारने केलेल्या विकास कामाची
संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहचवली जाईल.
यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर , खा.सुधाकर श्रुंगारे,संजय कोडगे,प्रेरणा होनराव,ज्ञानेश्वर चेवले , तानाजी बिरादार व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रेरणा होनराव यांनी जनतेचे आभार मानले..
मोदी सरकाने 8 वर्षात जे लोकहिताचे आणि देशहिताचे कार्य केले त्याबद्दल मोदीजींचे आभार आणि कौतुक केले आणि विषेता जनतेचे आभार मानले. जनतेने मोदी सरकारला बहुमताने निवडून दिले म्हणून हे कार्य करता आले. असे प्रेरणा होनराव यांनी आपले मत वेक्त केले.
मोदी सरकारचे मोठे आणि महत्वाचे निर्णय
कृषी कायदा – 2021 मध्ये मोदी सरकारने तीन कृषी कायदे आणले होते. या तीन कृषी कायद्यांना प्रचंड विरोध झाला होता. कृषी कायदे संसदेत मंजूर केल्यानंतर देशभरात एकच वाद निर्माण झाला होता. या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्लीत आंदोलन पुकारले होते. जवळपास 1 वर्ष शेतकऱ्यांचे हे आंदोलन चालले होते. अखेर सरकारने हे वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. हा केंद्र सरकारचा मोठा निर्णय असल्याचं बोललं जातं.
तिहेरी तलाक – तिहेरी तलाक कायदा हा मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय मानला जातो. हा कायदा झाल्यानंतर आता मुस्लिम महिला त्यांच्या हक्कांसाठी लढू शकतील. तसंच, त्यांना कायदेशीररित्याच घटस्फोट घेता येईल. 1 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारने तिहेरी तलाक कायदा मंजूर केले होते.
कलम 370 रद्द – जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे हा मोदी सरकारचा आजवरचा मोठा निर्णय आहे. राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे हे कलम रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. 5 ऑगस्ट 2019 रोजी सरकारने कलम 370 रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यातबरोबर, याबरोबरच कलम 35 A सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
नागरिकत्व कायदा – मोदी सरकारने संसदेतून नागरिकत्व कायदा मंजूर केला. 10 जानेवारी 2029 ला नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA लागू करण्यात आला. या कायद्यामध्ये भारताच्या शेजारील देशातून आलेले नागरिकांना भारतीय नागरिकत्व देणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. पण त्यात नागरिकत्वाची तरतूद नव्हती.
GST – 1 जुलै 2017 मध्ये मोदी सरकारने वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्यात आला. त्यामुळं संपूर्ण देशात करप्रणाली लागू करण्यात आली. निम्मा GST केंद्राकडे आणि निम्मा राज्यांकडे जाईल, असा निर्णय घेण्यात आला
सर्जिकल स्ट्राईक – 18 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या छावणीत घुसून झोपलेल्या जवानांवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 19 जवान शहीद झाले असून अनेक जखमी झाले होते.या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये ( POK ) घुसून दहशतवाद्यांना लक्ष्य केले. येथे उपस्थित असलेले सर्व दहशतवादी लाँचपॅड नष्ट करण्यात आले. तसेच या हल्ल्यात 40 हून अधिक दहशतवादी मारले गेले. या निर्णयाने मोदी सरकारचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात आले.
बालाकोट स्ट्राईक – पुलवामा येथे झालेल्या या हल्ल्यात 40 CRPF जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 26 फेब्रुवारीच्या सकाळी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी POK मध्ये प्रवेश केला आणि बॉम्बफेक केली. बालाकोटमध्ये दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले.या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले . यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमानेही भारतीय हद्दीत घुसली, ज्यांना भारतीय हवाई दलाने हूसकावून लावले. मात्र, यादरम्यान भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे विमान कोसळले आणि ते पाकिस्तानी सीमेवर गेले. काही दिवस कैदेत ठेवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
नोटबंदी – आठ नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली. यावेळी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. लोकांकडे असलेली रोकड कमी झाली व डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळाले, हा नोटबंदीचा फायदा झाला! असे बरेच निर्णय हा विकास रथ लोकांपर्यंत पोहचवणार आहे.