लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची इंटरनॅशनल विटी दांडू फेडरेशनच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – इंटरनॅशनल विटी दांडू फेडरेशन च्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी लातूरचे माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. विटी दांडू हा ग्रामीण भागात खेळला जाणारा खेळ आहे. हा अनेक देशांमध्ये पण खेळ खेळला जातो. विटी दांडू या खेळाचा समावेश ऑलिंपिकच्या खेळांमध्ये करण्यात यावा यासाठीची मागणी इंटरनॅशनल विटी दांडू

फेडरेशनची आहे. फेडरेशनच्या इंटरनॅशनल अध्यक्षपदी सर्वानुमते लातूर ( भारत) चे संसदरत्न माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंटरनॅशनल विटी दांडू फेडरेशनची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रो डॉ सुनील गायकवाड, उपाध्यक्ष दुरेसामी विजन( कोलंबो, श्रीलंका)सचिव प्रशांत नवगिरे (जालना,भारत), कोषाध्यक्ष

विद्या कांबळे (जालना,भारत) सदस्य आरतीला (भूतान ),सदस्य मोहम्मद हुसेन (ढाका,बांगलादेश) सदस्य राम शवा ( काठमांडू, नेपाल) कार्यकारणी इंटरनॅशनल अशी फेडरेशन च्या कार्यकारिणी ची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर माजी खासदार प्रो. डॉ. सुनील गायकवाड यांनी विटी-दांडू या खेळाला ऑलिंपिकच्या खेळामध्ये आणि खेलो इंडिया या

खेळा मध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना भेटून या खेळाचा समावेश भारतीय खेळामध्ये आणि शालेय खेळामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ.सुनील गायकवाड म्हणाले. त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

Recent Posts