महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडीची बैढक ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात बैढक घेऊन सर्वानुमते चेअरमन कालिदास पाटील तर व्हाईस चेअरमन दिनकर निटूरे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. निटूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध काढण्यात यशस्वी झाले
आहेत. त्या अनुषंगाने, निटूर गावातील राजकीय, सामाजिक, शेतकर्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात बैढक घेऊन एकमताने निवड करण्यात आली आहे. सदस्य व नागरिकांच्या संवादातून ही निवड झाली आहे.निवड झाल्यानंतर नवनियुक्त चेअरमन कालिदास पाटील व व्हाईस चेअरमन दिनकर निटूरे यांनी ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होऊन आम्हास काम करण्याची ऊर्जा देवो असे साकडे घातलेे.
ग्रामदैवतास दर्शन घेऊन गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.तसेच, गावातील नागरिकांनी यानिवडीबद्दल त्यांचा सत्कारही केला आहे. याप्रसंगी, नंदकुमार हासबे,राजकूमार सोनी, प्रसाद बुडगे, पंकज कुलकर्णी, विजय देशमुख, संगमेश्वर करंजे, भरत उकळे, राजकुमार मुचूटे,उत्तम पाटील शिवमुर्ती बुडगे, शब्बीर शेख, पोपट देशमुख, अंगद निटूरे, सुर्यकांत निटूरे, संदीप पाटील आदी जणांची उपस्थिती होती.
निटूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध निघाल्याने ग्रामदैवत श्री सादसाथ महाराज मंदिरात इतिहासात प्रथम हा पायंडा पडल्याने त्याचे अभिनंदनही करण्यात आले.तसेच,नवनियुक्त चेअरमन कालिदास पाटील व व्हाईस चेअरमन दिनकर निटूरे यांच्यासह सदस्यांचा यावेळी सत्कार समारंभ संपन्न झाला आहे.