लातूर जिल्हा

लातूरचे सुपुत्र बालाजी जाधव यांचा सामाजिक कार्याची दखल घेऊन सुनिर्मल फाउडेशन धारावी (मुंबई) च्या वतीने सन्मान

महाराष्ट्र खाकी (मुंबई ) – लातूर जिल्ह्या सह महाराष्ट्रात गरीब आणि गरजू नागरिक, रुग्ण यांना रक्ताची कमी पडणार नाही या साठी दिवसरात्र जनसेवेत स्वतः आणि आपल्या सामाजिक संस्थेला झोकून देणारे राजमाता बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालाजी भैय्या जाधव यांना सुनिर्मल फाउडेशन च्या वतीने बालाजी भैय्या जाधव व महाराष्ट्र महिला अध्यक्ष कल्पना ताई काटकर

यांना धारावी येथे समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आणि सन्मान प्रमुख पाहुणे यांच्या हास्ते देण्यात आला जगन्नाथ राव हेगडे मा. नगर पाल मुंबई व सुकृत खाडेकर संपादक प्रहार व विलास खानोलकर कवी लेखक सदस्य फिल्मी सेनसॅरबोर्ड दिल्ली व डाॕ. लक्ष्मणण शिवणेकर जेष्ठ शिक्षक तन्य साहित्यिक व मुनीर खान संपादक झुंझार केशरी व राजेश खंदारे जेष्ठ

समाज सेवक व महादेव शिंदे जेष्ठ समाज सेवक व शिवलिंग व्हटकर जेष्ठ समाज सेवक रमेश कदम जेष्ठ समाज सेवक यांच्या हास्ते देण्यात आला व संस्थेचे अध्यक्ष अॕड .शैलेश खंदारे सरचिडणीस राम म्हस्के खनिजदार ओमकार खंदारे व आदी सर्वाच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न व राजामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रजिटर या फाॕउडेशन ला देण्यात आले दि. 22/5/2022

रोजी सकाळी 10 वाजता धारावी मंबई येथे समाज गौरव पुरस्कार बालाजी भैय्या जाधव,व कल्पना ताई काटकर यांना हा पुरस्कार प्रधान करण्यात आला. या पुरस्कारबद्दल बालाजी जाधव आणि त्यांच्या संस्थेचे लातूर जिल्ह्यातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Most Popular

To Top