निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयास करीअर कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षातील जिल्हास्तरीय पुरस्कार

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान व सहाय्यता केंद्र, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘करीअर कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षातील जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केलेल्या

महाविद्यालयांची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. करीअर कट्टा या उपक्रमात आय.ए.एस.आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल हा विशेष पुरस्कार महाराष्ट्र महाविद्यालयास प्राप्त झाला. हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील सपकाळ नॉलेज हब याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास प्रमुख

अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव कोलपुके व करिअर कट्टाचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ.अरुण धालगडे यांनी कार्यक्रमात स्वीकारला. महाराष्ट्र महाविद्यालयाच्या या उपलब्धीबद्दल महाराष्ट्र शिक्षण

समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, संस्थेचे सचिव बब्रुवान सरतापे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनीही या यशाबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.

Recent Posts