महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहराला होणारा पाणी पुरवठा हा पिवळसार होत असल्याने मागील एक महिन्यापासून लातूरची जनता आणि मनपा प्रशासन परेशान होते. त्यात विरोधीपक्षाकडून आंदोलन ही झाले. महापौर आणि पालकमंत्री यांच्यावर ढिसाळ कारभाराचे आरोप झाले. पण या महिनाभराच्या काळात लातूरच्या जनतेने महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यावर दाखवलेला
विश्वास महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या कार्यातून दाखवला आहे असे म्हणावे लागेल. एक महिन्याच्या काळात विरोधी पक्ष, सामाजिक संघटना या घटनेचा राजकीय फायदा घेऊ पाहत होते मात्र महापौर विक्रांत गोजमगुंडे हे मात्र या पिवळ्या पाण्यापासून लातूरकरांना मुक्त करण्यात वेस्त होते. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश ही आले आहे असे म्हणावे लागेल. धनेगाव
येथील मांजरा धरण येथून कालव्याद्वारे पाणी सोडल्याने मागे साठून राहिलेले पाणी पुढे येत असताना त्यात शेवाळ वर्गीय जिवाणू यांचा क्लोरीन गॅसशी संपर्क आल्यानंतर पाणी पिवळसर होत होते, मात्र तज्ञांचा सल्ला घेवून क्लोरीन डाय ऑक्साईड चा वापर करण्यास सुरुवात केल्यानंतर पाण्याचा रंग नाहिसा होत असल्याचे स्पष्ट होत आहे. याकामी मार्गदर्शन करणारे सर्व तज्ञ, विशेषतः
मजीपा चे निवृत्त अभियंता विजय चोळखणे, क्लोरीन डाय ऑक्साईड चे पुरवठादार सुरेश कुलकर्णी, मनपा अभियंता विजय चव्हाण, वैद्य, रोहित पवार, स्थानिक मनुष्यबळ पुरवठा कंत्राटदार सिद्राम हारके, हाताची दोन बोटे गमावूनही कर्तव्य बजावणारे भुजबळ यांचे विशेष आभार महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले .
रात्री 1 वाजता महापौर यांनी स्वतः हजर राहून पाहणी केली.
काल दि 13 मे च्या रात्री उशिरापासून शहरात पाणी पुरवठा प्रारंभ करण्यात आला आहे. शहरातील संविधान चौक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्याची टाकी येथे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच रात्री 12.30 वाजता प्रकाश नगर येथील भागात भेट देवून प्रत्यक्ष पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधला. आज दि.14 मे पासून पाणी पुरवठा सुरू झाला
असला तरी शहरातील सर्व भागात पाणी पुरवठा होण्यास 8 दिवस लागतील. ज्या भागात पाणी पुरवठा होईल तेथे पाईप लाईन मध्ये साठून राहिलेले पाणी असल्याने पहिले 20 – 25 मिनिटे पाणी पिवळसर येवू शकते, त्यानंतर मात्र योग्य पाणी मिळणार आहे. केवळ नाममात्र पिवळसर झाक (रंग) असू शकते असे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आणि लातूरकरांनी दाखवलेल्या
संयमाबद्दल लातूरकरांचे मनापासून आभार व्यक्त केले .