महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील लिंबाळा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते शिवसेना व युवासेना च्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करत गावातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या शाखेच्या माध्यमातून सोडवल्या जातील तसेच अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, पाणी पुरवठा इत्यादी प्रश्नांच्या
संदर्भात संबंधित मंत्र्याच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवून आणून विकासाचे राजकारण करणार असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी शिवसेना शाखेच्या उद्घाटना प्रसंगी मत व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, संत शिरोमणी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजी पाटील रामेगावकर, बजरंग दादा जाधव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख
अँड. राहुल मातोळकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमे, सतीश शिंदे, बाबुराव शेळके, आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. लिंबाळा येथे शिवसेना,युवा सेना शाखेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बालाजी माने, अशोक सूर्यवंशी, शिवसेनेचे तालुका संघटक शिवचरण पाटील, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे,तालुकाप्रमुख
प्रशांत वांजरवाडे , प्रसाद मठपती व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख, ज्येष्ठ पत्रकार स्वामी साहेब, तानाजी भाऊ,सज्जन शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून सुभाष जाधव, उपशाखाप्रमुख दीपक महाजन, शाखा सचिव संदीप पाटील, सचिव भीमराव माने,शाखा संघटक वैजनाथ माने यांची नियुक्ती करण्यात आली. तर युवासेनेच्या
शाखाप्रमुखपदी अर्जुन माने,उपशाखाप्रमुख राजकुमार माने, सचिव ज्ञानेश्वर जाधव, शाखा विभाग प्रमुख माधव माने, महासचिव जयराम माने,शाखा संघटक नारायण माने, तर मार्गदर्शक म्हणून राजपाल पाटील, गणेश पवार, निवृत्ती माने, पांडुरंग पवार, बाबुराव वाडीकर, कमलाकर कांबळे नियुक्ती करण्यात आली.