महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात विविध विकासकामे होतात पण त्यातील काहीच संस्मरणीय असतात. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी स्वतःच्या गटात असलेल्या एकुर्का रोड या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेची किल्ल्याची प्रतिकृती असलेली ईमारत उभारली असून हा अक्षरकिल्ला आता ग्रामीण भागातील शिक्षणासाठी
पथदर्शक ठरला आहे. लोहारा गटातून निवडून आलेल्या राहुल केंद्रे यांनी जि.प.सदस्य म्हणून कार्य करताना पहिल्या अडीच वर्षात आपल्या गटातील प्रत्येक गावासाठी काही ना काही योजना आणत ग्रामविकासासाठी प्रयत्न केले.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील योजनांना गती देत आपल्या कार्याचा ठसा उमटविला.बाला
उपक्रमाच्या माध्यमातून लाखो रूपयांचा निधी लोकसहभागातून मिळवित जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाने जिल्ह्यातील शाळांचे रूप पालटले. याशिवाय हॕपी होम अंगणवाडी उपक्रमाची दखल घेत राज्यशासनाने लातूर जिल्हा परिषदेचा गौरव केला हे करीत असतानाच आपल्या गटातील जिल्हा परिषदेची शाळा संपूर्ण
जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरावी म्हणून त्यांनी संकल्प करीत यासाठी लोहारा गटातील एकुर्का रोड जि.प.शाळेची यासाठी निवड केली,या शाळेची जीर्ण झालेली अवस्था बदलून टाकत या शाळेला भौतिकदृष्ट्या सक्षम करण्याचा विडा उचलत जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला.केवळ निधी उपलब्ध करून न थांबता हे काम कसे दर्जेदार होईल यासाठी विशेष लक्ष
दिले. आपल्या संकल्पनेतील शाळा आकारास यावी म्हणून सातत्याने या कामाला भेटी देऊन प्रसंगी मिस्री व कामागारांशी संवाद साधून यासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ दिला.ऐतिहासिक किल्ल्याचे प्रवेशद्वार असणारी हा अक्षरकिल्ला आता शैक्षणिक क्षेत्रातील रोल माॕडेल ठरला आहे.खेळाचे भव्य मैदान,अत्याधुनिक रचना असलेले वर्ग ,शैक्षणिक व क्रिडा साहित्य यामुळे एकुर्का
रोडची शाळा आता जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील पथदर्शक शाळा बनली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आशास्थान म्हणजे जिल्हा परिषद शाळा होय. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यापासून जिल्हा परिषदेचे maji अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सर्वच विभागांमध्ये वैयक्तिक लक्ष देत अतिशय उत्कृष्ट कामे केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या लोहारा जिल्हा
परिषद गटामधील एकुर्का रोड येथील जिल्हा परिषदेची शाळाही अतिशय मोडकळीस आलेली होती, या शाळेकडे स्वतः जातीने लक्ष घालून व निधी उपलब्ध करून देऊन या शाळेचे रुपडं पाठवण्याचे काम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले आहे. फक्त निधीच दिला नाही तर स्वतःच्या अत्यंत धावपळीच्या कार्यकाळात स्वतः च्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवून या शाळेत बदल
घडवून आणला आहे. वेळोवेळी या कामात त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन उत्कृष्ट दर्जाचे काम करून घेत एक देखणी व सुंदर इमारत जिल्हा परिषद प्रा. शा.एकुर्का रोड येथे उभारली आहे. जिल्ह्यातील इतर जिल्हा परिषदेच्या बांधकामाच्या वेळी सर्वांसाठी आदर्श असे रोड मॉडेल या इमारतीमधून जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी उभारले आहे. संपूर्ण जिल्हाभरातून तसेच जिल्ह्याबाहेरील
शिष्टमंडळ या शाळेला भेट देऊन येथील कामाचे कौतुक करत असताना दिसून येत आहेत.शाळेला ऐतिहासिक भव्य किल्ल्यासारखे प्रवेशद्वार जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे. हे सर्व काम होत असताना स्वतः तेथे उपस्थित राहून जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे मिस्त्री व कामगार त्यांना योग्य त्या सूचना देत असत. भव्य खेळाचे मैदान,
प्रशस्त व हवेशीर असे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चे वर्ग, विविध खेळाचे साहित्य,शैक्षणिक साहित्य या सर्वांमुळे जिल्हा परिषद एकुर्का रोड ही शाळा जिल्हा परिषदेची एक रोल मॉडेल शाळा म्हणून पुढे आलेली आहे.