चाकूर पोलीस स्टेशन येथील 2 बेवारस ट्रकचा दि.10 मे ला जाहीर लिलाव

महाराष्ट्र खाकी ( चाकूर ) – चाकूर तालुका दंडाधिकारी यांनी चाकूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 2 बेवारस ट्रक स्क्रॅप करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या बेवारस ट्रकचा जाहीर लिलाव करुन जास्तीत- जास्त किंमत यावी या उद्देशाने लिलाव करावयाचा आहे.

या 2 बेवारस ट्रकांचा जाहीर लिलाव दि. 10 मे 2022 रोजी चाकूर पोलीस स्टेशन येथे करण्यात येणार असून ज्यांना या जाहीर लिलावामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी पोलीस स्टेशन दुरध्वनी क्रमांक 02382-252040 मो.नं. 9823478468 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक चाकूर पोलीस स्टेशन यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Recent Posts