महाराष्ट्र खाकी (लातूर) – मागील महिन्यापासून लातूर शहरात नळाद्वारे पिवळसर पाणी येत असल्यामुळे काही नागरिकांचे आरोग्य बिघाडीच्या तक्रारी दिसून आल्याने लातूर भाजपा कडून प्रेरणा होनराव सोशल मीडियावरून टिका केली होती,आणि अजित पाटील कव्हेकर यांनी आंदोलन केले होते. या पिवळसर पाणी पुरवठयामुळे पालकमंत्री यांच्या कारभाराव आरोप करण्यात आले होते.
पण आज पालकमंत्री अमित देशमुख यांनी महानगरपालिकेचे पदाधिकारी ,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, तसेच, जलसंपदा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे वरिष्ठ अधिकारी, यांची आढावा बैठक घेतली, लातूर शहरातील नागरिकांना नियमित शुद्ध पाणीपुरवठा करावा असे निर्देश यावेळी अमित देशमुख यांनी दिले आहेत.सध्या शेतीसाठी
धरणातून सांडवेद्वारे पाणी सोडले असल्यामुळे ते ढवळून निघून शेवाळे वरच्या बाजूस येत आहे. वर आलेल्या या शेवाळ्यावर कडक उन्हामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन पाण्याचा रंग बदलून तो तपकिरी पिवळसर होत आहे, जॅकवेल मधून पाईपलाईन द्वारे आलेल्या या पाण्याचे लातूर येथे शुद्धीकरण प्रकल्पात सिद्धीकरण केल्यानंतरही पाण्याचा रंग तसाच राहत आहे, रंगात बदल होत असला
तरी हे पाणी पिण्यासाठी योग्यच आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही अशी माहिती देवून नळाद्वारे पुरवठा होत असलेल्या पाण्याचा हा तपकिरी पिवळसर रंग घालवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने यावेळी दिली. या बैठकीदरम्यान उन्हाळ्याची वाढती तीव्रता,धरणातील पाणी उपलब्धता, पाणी पुरवठ्याची स्थिती या संदर्भाने
सखोल माहिती घेतली, शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाळावे, पुरवठ्यातील दोष दूर करावेत, पाण्याची शुद्धता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत,जनजागृती करून जनतेतील गैरसमज दूर करावेत, जनतेने पाणी उकळून, गाळून पिण्यासाठी वापरावे असे आवाहन करावे, रेन वॉटर हार्वेस्टिंग मोहीम प्रभावीपणे राबवावी आदि सूचना व निर्देश बैठकीदरम्यान दिले आहेत.