महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके) – मागिल दोन वर्षे कोरोना महामारीच्या काळात अनेक कामे प्रलंबित पडले आहेत,आपल्या भागात 76 टक्के जमिनीवर सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते.त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व मुबलक खताचा पुरवठा करावा,तसेच शेती आणि कृषी तंत्रज्ञान व शेतीपंपाला वीज जोडणीचे कामे तसेच शाळांमध्ये शौचालय ग्रामीण भागासाठी
कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी तात्काळ आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी अशा सूचना प्रशासनाला माजी मंञी तथा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आढावा बैठकीत दिल्या. दि 26 फेब्रुवारी रोजी विधानसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या निलंगा ,देवणी व शिरुर अनंतपाळ या तालुक्यातील विविध विभाग प्रमुखांची बैठक निलंगा येथील पंचायत
समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती .यावेळी माजी मंत्री तथा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर सर्व विभागांच्या विकासकामांचा आढावा घेऊन सर्व विभाग प्रमुखांना संमधीत खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या निधी खर्चामध्ये आरोग्य व शिक्षण विभागाला विशेष प्राधान्य द्यावे. मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शौचालय,कायमस्वरुपी पाणी
पुरवठा व इतर सोयीसुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात यावा तसेच ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा परिषदांच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळावे.याकरिता शाळेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडावे.अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणासाठी शिबिरे आयोजित करून मुलांमध्ये बाल्यावस्थेतच शिक्षणाविषयी गोडी निर्माण करावी तसेच निलंगा विधानसभा मतदार
संघातील 76 टक्के जमिनीवर सोयाबीनची पिकाची पेरणी केली जाते या शेतकऱ्यांना दर्जेदार बी बियाणे व मुबलक प्रमाणात खताचा पुरवठा करावा बियाण्याची व खताची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी तिन्ही तालुक्यातील कृषी विभागाने घ्यावी अशा सूचना दिल्या,तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी पारंपारिक शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्यायासाठी कृषितज्ञांच्या
मार्गदर्शनाखाली शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशही आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले.निलंगा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक विभागात येणाऱ्या शासनाच्या निधीचे सुक्ष्म नियोजन करुन वेळेत खर्च होण्यासाठी लवकरात लवकर आराखडा तयार करण्यात यावा अशा सूचना देऊन केंद्र शासनाच्या वतीने किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून
देण्यासाठी जनजागृती करावी.शेतीला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी रोहित्रे ( डीपी ) वेळेत पुरविण्याचे निर्देश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या,त्याच बरोबर राज्य शासनाच्या महावितरण विभागा अंतर्गत पुन्हा भारनियमन सुरु करण्यात आले . भारनियमन रात्रीच्या वेळी होणार नाही याची काळजी घावी विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास
होणार नाही,याची दक्षता घ्यावी. आता कोरोना संपला असून प्रशासनाने त्यांच्या कामाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच, काम करीत असताना कोणाच्याही दबावाखाली न येता कामे करावे असेही शेवटी सांगितले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी सौ.शोभाताई जाधव ,निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव , निलंगा गटविकास अधिकारी . अमोल
ताकभाते,देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे ,देवणी गटविकास अधिकारी महेश सुळे,शिरुर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जटाळे ,शिरुर अनंतपाळ गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण सर्व विभाग प्रमुख आदींची उपस्थिती होती .