महाराष्ट्र खाकी ( औसा ) – औसा तालुक्यातील काही नागरिकांनी मनरेगा, घरकुल व उमेद विभागाशी संबंधित योजनेबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी दि. 27 एप्रिल रोजी अचानक या कार्यालयाला भेटी देत कामाची तपासणी केली यावेळी यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी संबंधित विभागाची
चांगलीच कानउघाडणी केली. अचानक या कार्यालयात आमदार आल्याने उपस्थित लोकांनी या विभागातील तक्रारीचा पाढा त्याच्यासमोर वाचून दाखवला यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी कुठल्याही योजनेसाठी लोकांची लुट होता कामा नये.शेतकऱ्यांना कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची वेळ येवू नये यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्येकाची जबाबदारी व काम निश्चित करण्याच्या सूचना देत यापुढे
आशा तक्रारी येता कामा नये अशी सक्तीची सुचना यावेळी केली. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा येथे कृषी विभाग व औसा तहसील कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक घेतली या बैठकीत असमाधानकारक काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार म्हणाले की प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी
यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी एक चांगली संधी मिळाली आहे. या संधीचे सोने शेतकऱ्यांच्या हितासाठी करणे आवश्यक आहे. गतवर्षी पासून मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियानातून शेतकरी विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देण्यासाठी फळबाग लागवड आवश्यक आहे. यामध्ये
काही कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. त्यांचा योग्य सन्मान करून बक्षीस दिले जाईल. मात्र शुन्य काम करणाऱ्यांची गय केली जाणार. माझ्या मतदारसंघात त्यांनी कामच केले पाहिजे अन्यथा त्यांनी अन्य पर्याय निवडावा असा इशारा यावेळी त्यांनी दिला. या बैठकीत औशाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने, तालुका कृषी अधिकारी संजय
ढाकणे,उपमुख्य कार्यकारी अभियंता जयंत जाधव, नायब तहसीलदार आळंदकर आदीसह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दि. 20 मे रोजी मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियानाच्या समारोपप्रसंगी नागरसोगा व याकतपुर येथील कार्यक्रमासाठी रोहयो
विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार,राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.