महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर येथील पंचक्रोशीतील श्रध्दास्थानातील जाज्वल्य ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरातील प्रवेशव्दाराच्या चौबाजूंनी पितळी कोटींगचे काम व श्री सादनाथ महाराज यानावाने कोरीव कामाचे सुशोभिकरण सद्यस्थितीला प्रगतीपथावर चालू आहे. ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरातील गेल्या तीन-चार वर्षापासून
सुशोभिकरणाचे कामे प्रगतीपथावर आहेत.दि.26 एप्रिल ते 03 मे 2022 दरम्यान पंचक्रोशीतील गाजलेला अखंड हरिनाम व शिवकथा सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत.मंदिरात,अनेक जातीच्या झाडांची मांदियाळी हिरवीगार फूलून गेली आहेत.तसेच, आतील भागात विद्युत रोषणाईमुळे आकर्षण वाढले आहे.उंच टेकडीवर असलेले मंदिर भाविक-भक्तांसाठी
श्रध्दास्थान आहे. अखंड हरिनाम सोहळ्यात रोजनिहाय सुश्राव्य कीर्तनकारांची मेजवाणी, गायनकार, मृदिंगवादक, टाळकरी आदी जणांचा संच मोठ्यासंख्येने मंदिरात असतो. सप्ताह्यामध्ये निटूर व परिसरातिल भाविक-भक्तांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा,असे समस्त गांवकर्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.