महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने मागील बऱ्याच दिवसा पासून गढूळ पाण्याचा पुरवठा शहरात होत आहे. हिरवे पाणी आल्याने नागरिक धास्तावले आहेत. या गढूळ पाण्यामुळे अनेकांना पोटाचे दुखणे सुरू झालेले आहे.मात्र, महापालिकेच्या वतीने पाणी पिणे योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. इतकेच काय महापौर विक्रांत
गोजमगुंडे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक व्हिडीओ करून नळाचे पाणी पिऊन दाखवले. पण शहरात हिरवे पाणी येणे काही बंद झाले नही! या बद्दल भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव आणि लातूर शहरातील समस्यावर आणि जनतेच्या बाजूने खंबीर पणे प्रशासनाला आणि सरकारला जाब विचारून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या प्रेरणा होनराव
यांनी लातूरचे महापौर आणि मनपा प्रशासनाला जाब विचारला आहे आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या ढिसाळ कारभार लातूरच्या जनतेसमोर ठेवला आहे. प्रेरणा होनराव म्हणतात की लातूर शहरात गढूळ हिरवे पाणी येत आहे. यावर मनपा प्रशासन आणि महापौर किती गंभीर आहेत हे आठ दिवसातून दिसून आले आहे. असे गढूळ हिरवे पाणी पाजून लातूरकरांना किती आजार जाडवायचे
आहेत ? कोणास ठाऊक, महापौर फक्त सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करत आहेत या अडचणीकडे दुर्लक्ष करत आहेत. स्वतः मात्र जारचे (फिल्टर) पाणी पीत आहेत आणि लोकांना गढूळ हिरवे पाणी पाजत आहेत असा आरोप प्रेरणा होनराव यांनी केला आहे. आणि लातूरच्या जनतेला महापौर आणि आयुक्त यांनी हे हिरवे पाणी पिऊन दाखवाव आणि
जनतेला सांगावं हे पाणी आम्हीही पितोत तुम्हीही प्या अशी मागणी केली. आणि पुढे बोलताना त्या म्हणाल्या की जर हे पाणी त्याच्याकडे पोहचत नसेल तर लातूर भाजपा त्यांना देईल असे प्रेरणा होनराव म्हणाल्या.
लातूर मनपाचे स्पष्टीकरण – महानगरपालिकेच्या वतीने यासंदर्भात दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, लातूर शहर पाणीपुरवठा योजना मुख्य स्त्रोत असलेले मांजरा धरण क्षेत्रामध्ये पावसाळ्यात, हिवाळ्यात पाण्यामध्ये शेवाळाचे प्रमाण असल्याने व सध्या वाढलेल्या तापमानामुळे पाण्याची पातळी घटत जाते. विरघळलेले ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे पाण्यामध्ये
शेवाळ निर्मिती प्रक्रिया जलद गतीने होते. शेवाळमिश्रीत पाणी क्लोरीनच्या संपर्कात आल्याने कधीकधी पाण्याचा पिवळसर रंग येतो. या पाण्याची जलकुंभनिहाय पाणी चाचणी घेतली असता हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे दिसून आले आहे.