महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके ) – महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले, “1870 च्या दशकात पहिले साहित्य संमेलन झाले. साहित्यिकांनी सरकारला मार्गदर्शन करावे. साहित्याचा गाभा हा ग्रंथ आहे. त्याचा विसर पडू देऊ नये. ग्रंथ चळवळीला आणखी भरीव पाठबळ देण्याची
आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. संमेलनातील विचार राज्य सरकार गांभीर्याने घेते. उस्मानाबाद येथे मराठी भाषेला अभिजित दर्जा देण्याचा ठराव करण्यात आला होता. त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज सुरु करावे अशी मागणी करण्यात आली होती. या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. तसेच राज्य सरकार केंद्र सरकारला मराठीला
अभिजात दर्जा देण्याचा पाठपुरावा करीत आहे. 96 व्या साहित्य संमेलनाअगोदर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल असा विश्वास आहे. राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक केंद्र सुरु करणार असल्याची हमी देतो असे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले .