महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके )– महाराष्ट्र राज्यमंत्री, उदगीरचे आमदार आणि स्वागताध्यक्ष संजय बनसोडे म्हणाले, “मी साहित्यिक नसून अक्षरप्रेमी आहे. उदगीर शहरात अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा लाभला आहे. उदगीर शहराला ऐक्याची परंपरा आहे. मराठवाड्याला साहित्य संमेलनाचा वारसा आहे. जरी लातूरला हे पहिले साहित्य संमेलन होत असले तरी मराठवाड्यात आतापर्यत एकूण 7
संमेलने झाली आहेत. महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीने आपल्या हिरक महोत्सवी वर्षात साहित्य संमेलन आयोजित करण्याचे मान्य केले यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. उदगीरच्या भाषेला वेगळा बाज आहे. या शहरात भाषिक उत्सव होत आहे. यात जवळपास 50 हजार साहित्य रसिक भाग घेणार आहेत. शासनाने मायमराठीच्या प्रश्नांची दखल घेण्याची गरज आहे आणि
राज्य सरकार ते करीत आहे. त्याचाच भाग म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. आमच्या सीमा भागातील बांधवाना न्याय मिळावा, त्यांची जाचातून मुक्त करावे, अशी मागणी आहे. मला सांगताना अभिमान वाटतो की येथील नागरिक साहित्य संमेलनाच्या निमात्ताने अक्षरदिन तेवत ठेवतील, अशी ग्वाही देतो असे राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले .