साहित्य सोहळ्यासाठी उदगीर नगरी सज्ज ! ‘आपले संमेलन आपली जबाबदारी’ घोषवाक्य ठरले परिणामकारक

महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके) – संमेलन… संमेलन म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून सुरू झालेली लगबग आता पूर्णत्वास येऊ लागली आहे. उद्घाटन घटिका अवघ्या काही तासांवर आलेली असताना आयोजक, कार्यकर्ते, सहभागी मंडळी आणि शहरातील नागरिकांतही प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या

निमित्ताने शहराचे बसस्थानक, रेल्वेस्थानकापासून चौका-चौकातून शब्दोत्सवाला झालेली सुरुवात आता प्रत्यक्ष साहित्यिकांच्या आगमनापर्यंत येऊन ठेपलीय. जीवाची काहिली करणा-या उन्हात ठिकठिकाणी डोकावणा-या पांढ-या स्वच्छ स्वागत कमानी आणि भले मोठे आकर्षक फलक हा प्रत्येकाच्या औत्सुक्याचा विषय ठरला आहे. उदयगिरी महाविद्यालयाच्या हिरकमहोत्सवी

वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध दालने सज्ज झाली आहेत. सभामंडपापासून व्यासपिठापर्यंत सर्वत्र ध्वनीक्षेपण व्यवस्था, आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता या आवश्यक गोष्टी आज घडीला सज्ज आहेत. विद्युत पुरवठा , जनरेटर, वाहतूक यंत्रणा संमेलनस्थळी सज्ज झाली आहे. संमेलनानिमित्त येणा-या मान्यवरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक सुरक्षा रक्षकांसह

बाऊन्सरचाही ताफा परिसरात येऊन पोचला आहे. भव्य प्रांगणात होऊ घातलेल्या संमेलनाचे प्रवेशद्वार उदयगिरी किल्ल्याच्या प्रतिकृतीचा आभास निर्माण करणारे आहे. शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने संमेलनस्थळाचा सारा मार्ग नव्याने तयार झाला आहे. अंतिम टप्प्यात आलेली ही तयारी करताना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष, त्याला मिळणारा प्राध्यापकांचा अत्यंत उत्साही प्रतिसाद

हा एकुणच संमेलनाच्या यशस्वी आयोजनाची ग्वाही देणारा दिसून येत आहे. दरम्यान सामाजिक प्रतिनिधींनी कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आयोजकांशी थेट संवाद साधणे, सूचना, सुधारणा आदींबाबत सकारात्मक प्रतिक्रीया नोंदविणे या बाबीदेखील दखलपात्र आहेत.
तीन हजार कार्यकर्ते कार्यमग्न : बसवराज पाटील
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आजवर तीन हजार

कार्यकर्ते झटत आहेत. पुढील तीन दिवसात यापेक्षा अधिक हात गुंतण्यासाठी इच्छुक असून त्याबाबत आम्ही आनंदाने तत्पर असू असा विश्वास कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी व्यक्त केला. महाविद्यालयासाठी दुग्धशर्करा योग उदयगिरी महाविद्यालयाचे हिरक महोत्सवी वर्ष आणि 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असा दुग्धशर्करायोग जुळून आला आहे. त्यामुळे येथील

प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. ‘आपलं संमेलन आपली जबाबदारी’ या आशयाचे फलक शहरात झळकत असताना त्याची प्रत्यक्ष प्रचिती या महाविद्यालयात दिसून येत आहे. कुटुंबातील
लग्नसोहळ्यात सारे हात उत्साहाने राबावेत तशा पद्धतीची लगीनघाई येथे दिसावी ही हर्षानंदाची बाब. रसिकांनी

साहित्यिक उपक्रमांचा लाभ घ्यावा : ना. संजय बनसोडे
उदगीरमध्ये प्रथमच होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्यविषयक उपक्रमांची रेलचेल आहे. हे संमेलन उदगीरच्या दृष्टीने सुवर्णक्षण ठरणारे असे आहे. या संमेलनात अनेक साहित्यिक, कवी सहभागी होत आहेत त्यामुळे संमेलनात येणार्‍या साहित्य रसिकांना वैचारिक खाद्य मोठ्या प्रमाणावर मिळणार

आहे. संमेलनात अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष, नामदार संजय बनसोडे यांनी केले. नियोजित संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी केली संमेलनस्थळाची पाहणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांचे आज (दि. 21) सकाळी उदगीर येथे आगमन झाले. संमेलनाचे कार्याध्यक्ष

बसवराज पाटील नागराळकर, मुख्य समन्वयक दिनेश सास्तुरकर यांच्यासह संमेलनस्थळाची पाहणी केली. 214 स्टॉलस् ची सोडत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पुस्तकविक्रीसाठी 274 स्टॉलस् उभारण्यात आले असून त्यापैकी 214 स्टॉलस् ची सोडत आज काढण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, ग्रंथ प्रदर्शन

समिती सदस्य सुनिता राजे पवार, कैलास अतकरे, प्रदीप दाते, लक्ष्मीकांत पेंडसलवाड उपस्थित होते. येथे 25 स्टॉलस् घटकसंस्थांसाठी राखीव असून उर्वरित स्टॉलस हे पुस्तकविक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Recent Posts