महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर जिल्ह्यात कुठलाही गुन्हा उघडकीस आला आणि त्यात LCB ची मदत लागली नाही असे होतच नाही. प्रत्येक जिल्हा पोलिस दलात विवीध विभाग असतात त्यातीलच एक म्हणजे LCB विभाग असतो. लातूर जिल्हा LCB विभागाची गुन्हेगार पकडण्यात आणि गुन्हा उकल करण्यात अग्रेसर आहे असे म्हणावे लागेल. कारणही तसेच आहे. गुन्हा उघडकीस आणण्या करिता जी रणनीती करावी लागते त्या पेक्षा जास्त भारी रणनीती लातूर LCB चे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे हे तयार करत असतात आणि गुन्हेगार सापडला जातो आणि गुन्ह्याची
उकल लवकर होत असते. लातूर मध्ये असाच एक गुन्हा घडला होता दिनांक 11/04/2022 रोजी लातूर येथील एक कोल्ड्रिंक्सच्या एजन्सीमध्ये मुनीम म्हणून काम करणारे इसमास काही अनोळखी आरोपींनी पाळत ठेवून रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास बाभळगाव शिवारात लातूर ते लोदगा जाणारे रोडवर “तुझ्या टेम्पोने आमच्या गाडीत कट बसला आहे” असे खोटे कारण सांगून टेम्पो थांबवून टेम्पो चालकास व फिर्यादीला मारहाण करून फिर्यादी जवळील कोल्ड्रिंक्स विकून जमा झालेले 02 लाख 76 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन मोटार सायकल वर बसून पळून गेले होते. तक्रारदाराच्या फिर्यादीवरून पोलीस
स्टेशन लातूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 76/ 2022 कलम 394,34 भादवि प्रमाणे अज्ञात अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे व लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करण्यात आली होती. पथकातील पोलिस अंमलदारांना तपासाचे अनुषंगाने सूचना देऊन रवाना करण्यात आले होते. गुन्ह्यातील फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनावरून व तपास पथकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी गुन्ह्यातील आरोपी
1) आकाश उत्तम गायकवाड, राहणार लोदगा तालुका औसा,2) अरविंद उर्फ कुलदीप बालाजी डावखरे, वय 21 राहणार वाल्मिक नगर लातूर,3) सचिन रघुनाथ डुबलगंडे, वय 24 राहणार पंचवटी नगर लातूर,4) प्रदीप अनुरथ सूर्यवंशी, वय 35, राहणार शिवनी तालुका औसा हल्ली मुक्काम गवळीनगर ,लातूर,5) अहमद निसार शेख, वय 22, राहणार पान चिंचोली तालुका निलंगा,6)जाफर मलंग शेख, वय 25 राहणार पान चिंचोली तालुका निलंगा
अशा 06 आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदरच्या तपास पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अवघ्या काही तासातच सदरच्या गुन्ह्याची उकल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली वाहने एक मोटारसायकल आणि एक प्लेझर ॲक्टिव्हा ताब्यात घेण्यात आली असून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक गणेश कदम,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वाचे पोलीस अमलदार राजेंद्र टेकाळे ,प्रकाश भोसले ,खुर्रम काजी ,रवी गोंदकर, यशपाल कांबळे, केंद्रे तसेच लातूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि प्रतिभा ठाकूर,पोलीस अमलदार संतोष हजारे, किशोर आळणे, राहुल दरोडे, बळीराम फड ,उत्तम देवके यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास लातूर ग्रामीण पोलीस पोलीस करीत आहेत.