माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांनी अनुभवली द-कश्मिर फाईल्‍सची दाहकता

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) -केवळ भारतातच नव्‍हे तर सातासमुद्रापार चर्चेत असलेला द-कश्मिर फाईल्‍स हा चित्रपट लातूरातही प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटात 1990 साली कश्मिरी पंडि‍त यांच्‍यावर झालेल्‍या अत्‍याचाराचे सत्‍य आणि वास्‍तव मांडण्‍यात आलेले आहे.

हा चित्रपट माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांनी चित्रपटगृहात पाहात त्‍यांची दाहकता अनुभवली यावेळी आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍यासह शहर जिल्‍हयाचे पक्ष पदाधिकारी, मनपा नगरसेवक व बुथ प्रमुख यांचीही उपस्थिती होती. चित्रपट संपल्‍यानंतर उपस्थितांनी भारत माता की जय, वंन्‍दे मातरम या घोषणांनी चित्रपटगृह दणाणुन सोडत 90 च्‍या दशकात दहशतीला बळी पडलेल्‍यांना दोन मिनिट स्‍तब्‍ध राहून श्रध्‍दांजंली अर्पण केली.

विवेक अग्‍नीहोत्री दिगदर्शित व अनुपम खेर यांची मुख्‍य भूमिका असलेला द-कश्मिर फाईल्‍स या चित्रपटाची चर्चा भारतातच नव्‍हे तर संपुर्ण जग भरात होत आहे. 90 च्‍या दशकात दहशतवादयांनी कश्मिरमध्‍ये हिंदूसह कश्मिरी पंडि‍तांवर अमानुष अत्‍याचार केलेले आहेत. अनेक कश्मिरी पंडि‍ताना दहशतवादयांच्‍या दबावामुळे आणि त्‍यांच्‍या छळामुळे कश्मिर येथून स्‍थलांतरीत व्‍हावे लागले होते.

याबाबत असलेले वास्‍तव आणि सत्‍य द-कश्मिर फाईल्‍सच्‍या माध्‍यमातून मांडण्‍यात आलेले आहे. हा चित्रपट देशभरात रेकॉर्डब्रेक गर्दी करीत आहे. लातूरातही हा चित्रपट प्रदर्शित झालेला असुन माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांनी या चित्रपटाची दाहकता अनुभवली आहे. यावेळी आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍यासह प्रदेश कार्यकारणी सदस्‍य शैलेश लाहोटी, प्रदेश भाजयुमोच्‍या सचिव प्रेरणा होनराव, शहर जिल्‍हाध्‍यक्ष गुरूनाथ मगे,

मनपा गटनेते अॅड.शैलेश गोजमगुंडे, शहर महिलाध्‍यक्षा मीना भोसले यांच्‍यासह शहर जिल्‍हयाचे पक्ष पदाधिकारी, मनपा नगरसेवक , बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होते. चित्रपट संपल्‍यानंतर उपस्थितांनी दोन मिनिट स्‍तब्‍ध उभारून कश्मिरमध्‍ये बळी पडलेल्‍या नागरिकांना श्रध्‍दांजंली अर्पण केली. त्‍याच बरोबर भारत माता की जय, वंन्‍दे मातरम या घोषणांनी चित्रपटगृह दणाणुन सोडले होते.

 

भाजपाच्‍या वतीने चित्रपट टॅक्‍स फ्री – आ.संभाजी पाटील निलंगेकर

कश्मिरमध्‍ये 90 च्‍या दशकात हिंदु आणि कश्मिरी पंडित यांच्‍यावर झालेल्‍या अत्‍याचाराचे सत्‍य आणि वास्‍तव या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून दाखविण्‍यात आले असल्‍याचे सांगत हा चित्रपट प्रत्‍येक भारतीयांनी पाहणे अत्‍यंत गरजेचे असल्‍याचे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले हा चित्रपट देशातील अनेक राज्‍यामध्‍ये टॅक्‍स फ्री करण्‍यात आलेला असुन महाराष्‍ट्रातही टॅक्‍स फ्री करण्‍यात यावा अशी मागणी भाजपासह अनेक सामाजिक संघटनानी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.

मात्र महाविकास आघाडी सरकारने यांला अनुकुलता दर्शविलेली नाही. या चित्रपटातील वास्‍तव आणि सत्‍य सर्वांनाच पाहाता यावे याकरीता लातूर भाजपाच्‍या वतीने हा चित्रपट टॅक्‍स फ्री करण्‍यात आल्‍याची घोषणा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केली. दिवसभरात हा चित्रपट किती जण तिकीट खरेदी करून पाहतील त्‍या तिकिटांचा टॅक्‍स चित्रपटगृहाच्‍या मालकाकडे भाजपाच्‍या वतीने जमा करण्‍यात येणार आहे.

विशेष म्‍हणजे याकरीता चित्रपटगृहाच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे आगाऊ रक्‍कमही जमा करण्‍यात आल्‍याचे सांगुन आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा चित्रपट प्रत्‍येक लातूरकरांसह जिल्‍हयातील नागरिकांनी पाहावा असे आवहान आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केले.

Recent Posts