महाराष्ट्र

लातूरचे माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड यांची DPIAF च्या राष्ट्रीय सल्लागार पदीनियुक्ती

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स(DPIAF) च्या राष्ट्रीय सल्लागार पदी लातूरचे माजी खासदार संसद रत्न प्रोफेसर डॉ सुनील गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. सुनील गायकवाड यांनी केलेल्या अनेक सांस्कृतिक, सामाजिक ,कार्याची दखल घेऊन बॉलीवुड सारख्या क्षेत्रांमध्ये अत्यंत मानाचे काम करणारी संस्था दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्म मुंबई.या संस्थेच्या राष्ट्रीय सल्लागार पदी डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्म ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष, गरीबों के ॲक्टर ,प्रसिद्ध कलाकार सिनेअभिनेते कल्याणजी जाना यांनी नुकतेच माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची राष्ट्रीय सल्लागार पदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले आहे.

देशामध्ये दादासाहेब फाळके यांचा मुंबई येथे पहिल्यांदा पंधरा फूट उंचीचा पुतळा बसवण्याचं काम दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड ही संस्था करत आहे . आता पर्यंत अनेक क्षेत्रातील कलावंतांना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान देण्याचं काम ही संस्था करत असते. अतिशय प्रतिष्ठित अशा या संस्थेच्या राष्ट्रीय सल्लागार पदी डॉ. सुनिल गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मित्रपरिवारात अभिनंदन होत आहे .त्याबद्दल त्यांचे कल्याणजी जाना, अंकिता जाना ,भेरू जैन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Most Popular

To Top