महाराष्ट्र खाकी (औसा ) – काल महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ED ने सकाळी घरी जाऊन चौकशी साठी ताब्यात घेतले आणि संध्यकाळ पर्यंत कोर्टाकडून चौकशीसाठी कस्टडी मागितली आणि कोर्टाने 8 दिवसाची कस्टडी मिळाली. आणि आरोप प्रतिअरोप सुरु झाले. आणि आज महाविकासाघाडी सरकारच्या सर्व मंत्र्यांनी आणि नेत्यांनी नवाब मलिक यांच्या समर्थनात आंदोलन करत आहेत. या आंदोलनावर भाजपचे नेते प्रतीक्रिय देत आहेत. भाजपचे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी या आंदोलनावर पतिक्रिय दिली आहे आणि एक प्रश्न उपस्थित केला आहे.
250 पेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचे जीव घेणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून कवडीमोल भावात जमीन घेण्याच्या आरोपाखाली 8 दिवसांची ED कस्टडी मिळालेल्या व्यक्तीच्या समर्थनार्थ आज संपूर्ण आघाडी सरकार आंदोलन करत आहे.
महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला आहे की “जेंव्हा शेतकऱ्यांची वीज तोडली जात होती, शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा नाकारला जात होता, मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले होते, OBC समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले होते, भरती प्रक्रियेतील अव्यवस्थापनामुळे व भ्रष्टाचारामुळे विद्यार्थी आत्महत्या करत होते, ST कर्मचारी आत्महत्या करत होते” तेंव्हा आपण सर्वजण कुठे दडून बसला होतात???